बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समध्ये आज भारतीय महिला क्रिकेट संघ बार्बाडोसशी भिडणार आहे. सेमीफायनलसाठी टीम इंडियासाठी हा सामना महत्त्वाचा आहे. भारत आणि बार्बाडोस यांच्यातील सामना आज खेळवणार असुन हा सामनी भारतीय वेळेनुसार रात्री 10:30 वाजता सुरू होईल. तसेच भारताने हा सामना जिंकल्यास उपांत्य फेरीतील स्थान निश्चित होईल. आतापर्यंत फक्त ऑस्ट्रेलियन संघ उपांत्य फेरीत पोहोचला आहे. दरम्यान हा सामना तुम्ही सोनी स्पोर्ट्स SD/HD चॅनेलवर 2022 कॉमनवेल्थ गेम्स पाहू शकतात. तसेच Sony TEN 1, Sony TEN 2, Sony TEN 3, Sony SIX किंवा Sony TEN 4 हा कार्यक्रम इंग्रजी आणि प्रादेशिक भाषांमध्ये प्रसारित करण्यासाठी सज्ज आहेत.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)