IND-W vs BAN-W, World Cup 2022: आयसीसी महिला विश्वचषकच्या 22 व्या सामन्यात भारतीय महिलांनी (India Women) बांगलादेश महिला संघाचा (Bangladesh Women) 110 धावांनी धुव्वा उडवला आणि आपल्या सेमीफायनल खेळण्याच्या आशा पल्लवित ठेवल्या. टीम इंडियाने (Team India) दिलेल्या 230 धावांच्या प्रत्युत्तरात बांगलादेश संघ 40.3 षटकांत 119 धावाच करू शकला, परिणामी मिताली ब्रिगेडने स्पर्धेत आपला तिसरा विजय नोंदवला. भारताच्या या विजयात यास्तिका भाटियाने (Yastika Bhatia) फलंदाजी आणि गोलंदाजांनी विशेषतः स्नेह राणा (Sneh Rana) हिने महत्वपूर्ण भूमिका बजावली. यास्तिकाने बॅटने सर्वाधिक 50 धावा केल्या तर स्नेह राणा हिने चार विकेट घेतल्या.
A magnificent win for #TeamIndia 🙌
They beat Bangladesh by 110 runs to keep their semi-finals qualification hopes alive. #CWC22 pic.twitter.com/WiVq4VNyNW
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) March 22, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)