आशिया चषकातील सुपर 4 फेरीतील दुसऱ्या सामन्यात भारताचा संघ श्रीलंकेसोबत दोन हात करण्यासाठी मैदानावर उतरला आहे. कोलंबोच्या मैदानावर भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना सुरू आहे. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र श्रीलंकेचा 20 वर्षीय गोलंदाज दुनिथ वेलालागेने भारतीय संघाला आज सुरुवातीपासून धक्के दिले. वेलालागेने 5 विकेट घेतले. वेलालागेने शुभमन गिल (19), विराट कोहली (3) रोहित शर्माला (53) केएल राहुलला (39) आणि हार्दिक पंड्या (5) यांना बाद केले. वेलालागेला पार्ट टाईम स्पिनर असालंकाची साथ मिळाली. असालंकाने देखील 4 विकेट घेतल्या. सध्या पावसामुळे खेळ थांबला असून 47 षटकांत 9 बाद 197 धावा झाल्या आहेत.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)