IND vs SL 1st T20I: कोलंबो (Colombo) येथे यजमान श्रीलंका (Sri Lanka) संघाविरुद्ध भारतीय संघाने (Indian Team) पहिल्या टी-20 सामन्यात निर्धारित 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 164 धावा केल्या व लंकन संघाला विजयासाठी 165 धावांचे लक्ष्य दिले. भारताकडून सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) 50 धावांची खेळी केली तर कर्णधार शिखर धवनने (Shikhar Dhawan) 46 धावांचे योगदान दिले. तसेच, ईशान किशन 20 धावा व कृणाल पांड्या 2 धाव करून नाबाद परतले. दुसरीकडे, श्रीलंकेसाठी वनिंदू हसरंगा व दुश्मंथ चमीरा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स काढल्या तर चमिका करुणरत्ने याने 1 विकेट काढली.
Shikhar Dhawan and Suryakumar Yadav had set up a nice platform, but India didn't get the finish they'd have liked
Can Sri Lanka chase this?#SLvIND
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) July 25, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)