पर्थच्या मैदानावर भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) संघ यांच्यात टी-20 विश्वचषकाचा (T20 WC 2022) महत्त्वाचा सामना खेळला जात आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 133 धावा केल्या. अशाप्रकारे दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 134 धावांचे लक्ष्य आहे. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, कर्णधाराचा हा निर्णय योग्य ठरला नाही, कारण तो स्वत: आधी बाद झाला आणि नंतर विकेट पडू लागल्या. सूर्यकुमार यादवच्या अर्धशतकाच्या जोरावर संघाला 20 षटकांत 9 गडी गमावून 133 धावा करता आल्या.
Innings Break!@surya_14kumar shines with the bat as #TeamIndia post 133/9 on the board. #T20WorldCup | #INDvSA
Over to our bowlers now. 👍 👍
Scorecard ▶️ https://t.co/KBtNIjPFZ6 pic.twitter.com/DNNQtZfiHu
— BCCI (@BCCI) October 30, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)