IND vs PAK Women's World Cup 2022: ‘सांगली स्मॅशर’ Smriti Mandhana ने पाकिस्तानविरुद्ध ठोकले शानदार अर्धशतक; मिताली, अंजुम यांच्या यादीत मिळवले स्थान
भारतीय सलामीवीर स्मृती मंधाना हिने आयसीसी महिला विश्वचषक 2022 मध्ये कट्टर प्रतिस्पर्धी भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील हाय-व्होल्टेज सामन्यात एका दमदार अर्धशतकासह एक विशेष टप्पा गाठला. मंधानाने 75 चेंडूत महत्त्वपूर्ण 52 धावा केल्या. स्मृतीने पाकिस्तानविरुद्ध सलग लढाऊ डाव खेळून इतिहास रचला आणि टीम इंडियासाठी एकदिवसीय फॉर्मेटमध्ये 2,500 धावाही पूर्ण केल्या.
भारताची स्टार सलामीवीर स्मृती मंधाना (Smriti Mandhana) हिने सध्या सुरु असलेल्या आयसीसी महिला विश्वचषकच्या (ICC Women's World Cup) सलामीच्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) 39 धावांचा आकडा गाठताच एक मोठा विक्रम केला आहे. मंधानाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 2500 धावा पूर्ण करणारी भारताची चौथी फलंदाज ठरली आहे. मंधानापूर्वी मिताली राज, अंजुम चोप्रा आणि हरमनप्रीत कौर यांनी हा मैलाचा दगड पार केला आहे.
Most runs for 🇮🇳INDIA in ODIs:
Smriti Mandhana completes 2500 ODI Runs.
7623 - Mithali Raj
2856 - Anjum Chopra
2664 - Harmanpreet Kaur
2500 - Smriti Mandhana** 👈#TeamIndia #SmritiMandhana #CWC22 pic.twitter.com/FBfp0svCuo
— Female Cricket #CWC22 (@imfemalecricket) March 6, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 06, 2022 10:22 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

