IND vs NZ 3rd T20I: दीपक चाहरची दमदार फलंदाजी पाहून Rohit Sharma ने ठोकला कडक सलाम, पहा Video
यजमान भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील टी-20 मालिकेतील शेवटचा सामना ईडन गार्डन्सवर खेळला गेला. या सामन्यात भारताने फलंदाजीत चांगली सुरुवात केली, पण नियमित विकेट पडू लागल्याने भारतीय डाव गडगडला. पण शेवटी दीपक चाहरच्या छोटेखानी खेळीने सगळ्यांचीच मनं जिंकली. त्याने या डावात एक षटकारही मारला, जो पाहून हिटमॅन त्याला सलाम करताना दिसला.
खालच्या फळीतील फलंदाज दीपक चाहरने (Deepak Chahar) रविवारी कोलकाता (Kolkata) येथील ईडन गार्डन्सवर प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले आणि मालिकेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध पहिले फलंदाजी करत भारताला 184 धावांची स्पर्धात्मक धावसंख्या उभारण्यास मदत करण्यासाठी 8 चेंडूत नाबाद 21 धावा ठोकल्या. अॅडम मिल्नेने (Adam Milne) टाकलेल्या अंतिम षटकात भारतीय गोलंदाजाने कमालीचा षटकार मारल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) चाहरला सलाम करताना दिसला.
Rohit reaction to Deepak Chahar’s six 🤩 #indvnz pic.twitter.com/JHurIXkEP8
— Mon (@4sacinom) November 21, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 21, 2021 10:53 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

