IND vs NZ 2nd Test: मुंबई कसोटीत संपूर्ण भारतीय संघाला गुंडाळणाऱ्या Ajaz Patel चे अश्विनने टाळ्या वाजवून केले अभिवादन, पहा व्हिडिओ

भारतीय वंशाचा डावखुरा किवी फिरकीपटू एजाज पटेलने भारताविरुद्ध मुंबई कसोटीच्या पहिल्या सर्व 10 विकेट घेतल्या. यादरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये आर अश्विन ड्रेसिंग रूममध्ये उभा एजाजसाठी टाळ्या वाजवताना दिसत आहे. बीसीसीआयने हा व्हिडिओ आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर अपलोड केला आहे.

IND vs NZ 2nd Test: मुंबई कसोटीत संपूर्ण भारतीय संघाला गुंडाळणाऱ्या Ajaz Patel चे अश्विनने टाळ्या वाजवून केले अभिवादन, पहा व्हिडिओ
अश्विनने एजाज पटेलचे केले अभिवादन (Photo Credit: Twitter/BCCI, PTI)

भारतीय वंशाचा डावखुरा किवी फिरकीपटू एजाज पटेल (Ajaz Patel) कसोटी क्रिकेटच्या 144 वर्षांच्या इतिहासात एका डावात सर्व 10 विकेट घेणारा तिसरा गोलंदाज ठरला आहे. मुंबईत (Mumbai) जन्मलेल्या एजाजने भारताविरुद्ध (India) मुंबई कसोटीच्या पहिल्या डावात ही कामगिरी केली. एजाजची ही चमत्कारिक कामगिरी पाहून सगळेच त्याला सलाम करत आहेत. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये आर अश्विन (R Ashwin) ड्रेसिंग रूममध्ये उभा एजाजसाठी टाळ्या वाजवताना दिसत आहे. हा व्हिडिओ बीसीसीआयने (BCCI) आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर अपलोड केला आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 04, 2021 03:51 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).