IND vs NZ 2nd T20I 2021: भारत (India) आणि न्यूझीलंडच्या (New Zealand) मालिकेतील दुसऱ्या टी-20 सामन्यात रांची येथे भारतीय कर्णधार रोहित शर्माने (Rohit Shrama) टॉस जिंकला आणि JSCA स्टेडियमवर पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आजचा सामना दोन्ही संघासाठी निर्णायक असणार आहे, त्यामुळे गेल्या सामन्यातील प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन्ही संघात मोठे बदल झाले आहेत. भारतासाठी आजच्या सामन्यातून आयपीएल 2021 चा घातक गोलंदाज हर्षल पटेलने (Harshal Petel) टी-20 पदार्पण केले आहे. हर्षलला संधी देण्यासाठी दुखापतग्रस्त मोहम्मद सिराजला बाहेर केले आहे.

भारत प्लेइंग XI

रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, सूर्यकुमार यादव/ईशान किशन, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, आर अश्विन, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर आणि हर्षल पटेल.

न्यूझीलंड प्लेइंग XI

टिम साउदी (कॅप्टन), मार्टिन गप्टिल, डॅरिल मिशेल, मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, टिम सेफर्ट (विकेटकीपर), जेम्स नीशम, ईश सोढी, मिचेल सँटनर, अ‍ॅडम मिल्ने आणि ट्रेंट बोल्ट.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)