आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 चा 29 वा सामना आज लखनौमध्ये टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात खेळला जात आहे. लखनौच्या इकाना स्टेडिअमवर भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये लढत होणार आहे. इंग्लंड संघाला स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी आजच्या सामन्यात विजय अनिवार्य आहे, दुसरीकडे टीम इंडियाने आजचा सामना जिंकला तर सेमीफायनलचे तिकिट निश्चित होणार आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या टीम इंडियाला पहिला मोठा झटका बसला. सलामीवीर शुभमन गिल 9 धावा करून ख्रिस वोक्सचा बळी ठरला. तर विराट कोहली हा शुन्य धावांवर बाद झाला. टिम इंडियाचा स्कोर 27/2.
पाहा पोस्ट -
CWC2023. WICKET! 3.6: Shubman Gill 9(13) b Chris Woakes, India 26/1 https://t.co/Jki6Vd2GY0 #INDvENG #CWC23
— BCCI (@BCCI) October 29, 2023
CWC2023. WICKET! 6.5: Virat Kohli 0(9) ct Ben Stokes b David Willey, India 27/2 https://t.co/Jki6Vd2GY0 #INDvENG #CWC23
— BCCI (@BCCI) October 29, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)