IND vs ENG 1st Test Day 1: पहिल्या नॉटिंगहम (Nottingham) कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात यजमान इंग्लंड (England) व भारतीय संघाने (Indian Team) वर्चस्व गाजवले आहे. ब्रिटिश कर्णधार जो रूटने (Joe Root) अर्धशतक ठोकले व जॉनी बेअरस्टोच्या साथीने संघाला शंभरी पार करून दिली. दिवसाच्या टी-ब्रेकपर्यंत यजमान संघाचा स्कोर 138/3 असा आहे. रुत 52 धावा करून खेळत होता. दुसऱ्या सत्रात मोहम्मद शमीने (Mohammed Shami) यजमान संघाला दोन धक्के दिले. पहिले त्याने सिब्लीला 18 धावांवर बाद केलं तर ब्रेकपूर्वी जॉनी बेयरस्टोला पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)