टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2023 चा (Border-Gavaskar Trophy 2023) हाय व्होल्टेज ड्रामा सुरू झाला आहे. चार सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळला जात आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने 54 षटकांत 4 गडी गमावून 156 धावा केल्या आहेत. 47 धावांची आघाडीही घेतली आहे. कॅमेरून ग्रीन 10 चेंडूत 6 धावा तर पीटर हँड्सकॉम्ब 36 चेंडूत 7 धावा करून खेळत आहे. तर पहिल्या डावात फलंदाजी करताना टीम इंडिया 33.2 षटकात अवघ्या 109 धावांवर आटोपली. टीम इंडियाकडून विराट कोहलीने सर्वाधिक 22 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून मॅथ्यू कुहनमनने सर्वाधिक 5 बळी घेतले. दरम्यान, दुसऱ्या दिवसाच्या खेळाला थोड्यावेळात सुरुवात होईल. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या अनेक चॅनेलवर पाहता येईल. याशिवाय डीडी स्पोर्ट्सवरही या सामन्याचे थेट प्रक्षेपण होणार आहे. हॉटस्टारचे सदस्यत्व असलेले वापरकर्ते ऑनलाइन स्ट्रीमिंगद्वारे सामन्याचा आनंद घेऊ शकतात.
#UmeshYadav will be in hunting mode against the mighty #Aussies in pursuit of his milestone. 🥵
Tune-in to the 3rd Mastercard #INDvAUS Test
Today | 9:00 AM onwards | Star Sports Network & Disney+Hotstar.#Cricket #BelieveInBlue #TestByFire pic.twitter.com/db7GqOGUp3
— Star Sports (@StarSportsIndia) March 2, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)