आयसीसी विश्वचषक 2023 च्या (ICC Cricket World Cup 2023) नवव्या सामन्यात बुधवारी (11 ऑक्टोबर) दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर भारत आणि अफगाणिस्तानचे (IND vs AFG) संघ आमनेसामने आहे. दोन वेळा विश्वविजेता भारत हा जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा संघ आहे तर अफगाणिस्तानचा संघ वनडे क्रमवारीत नवव्या स्थानावर आहे. अशा स्थितीत टीम इंडियासमोर अफगाणिस्तानला मात करण्याचे आव्हान असेल. विश्वचषक स्पर्धेतील पहिल्या सामन्यात बांगलादेशकडून अफगाणिस्तानचा 6 विकेटने पराभव झाला तर या मैदानात ते आपल्या पहिल्या विजयाच्या शोधात असतील. भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे आहे, तर अफगाणिस्तानचे कर्णधार हशमतुल्ला शाहिदीकडे आहे. दरम्यान, अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
दोन्ही संघाची प्लेइंग 11
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
अफगाणिस्तान: रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान, रहमत शाह, हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), नजीबुल्ला झदरन, मोहम्मद नबी, अजमतुल्ला उमरझाई, रशीद खान, मुजीब उर रहमान, नवीन-उल-हक, फजलहक फारुकी.
Afghanistan playing with the same XI.
Naveen Ul Haq is also playing...!!! pic.twitter.com/4HsMW4a3QQ
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 11, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)