Sri Lanka National Cricket Team vs West Indies Cricket Team: श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध वेस्ट इंडिज राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना आज पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर (Pallekele International Cricket Stadium) खेळवला जाणार आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेने वेस्ट इंडिजचा पाच गडी राखून पराभव करत 2-0 अशी आघाडी घेतली. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंका संघ क्लीन स्वीप करण्यासाठी मैदानात उतरेल, तर वेस्ट इंडिज संघाला व्हाईट वॉश टाळायचा आहे. श्रीलंकेची कमान चारिथ असलंका यांच्या हाती आहे. तर वेस्ट इंडिजचे नेतृत्व शाई होप करत आहे. दरम्यान, वेस्ट इंडिजचा कर्णधार शाई होपने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आणि श्रीलंकेला फलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे.
पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
वेस्ट इंडिज क्रिकेट संघ: ब्रँडन किंग, एविन लुईस, केसी कार्टी, शाई होप (विकेटकीपर/कर्णधार), शेरफेन रदरफोर्ड, ज्वेल अँड्र्यू, रोस्टन चेस, गुडाकेश मोती, मॅथ्यू फोर्ड, अल्झारी जोसेफ, जेडेन सील्स.
श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ: पाथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदिरा समरविक्रमा, चारिथ असलंका (कर्णधार), जेनिथ लियानागे, कामिंदू मेंडिस, वानिंदू हसरंगा, महिष थेक्षाना, असिथा फर्नांडो, दिलशान मदुशांका.
West Indies won the toss and elected to field first. #SLvWI pic.twitter.com/j3umrZcToT
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) October 26, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)