तीन सामन्यांच्या T20I मालिकेतील दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने (Team India) दक्षिण आफ्रिकेचा 16 धावांनी पराभव करत मालिका जिंकली. आफ्रिकेविरुद्ध मायदेशात टी20 मध्ये भारताचा हा पहिला मालिका विजय आहे. भारताने पहिला सामना 8 गडी राखून जिंकला होता. दुसऱ्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना केएल राहुल (57), सूर्यकुमार (61) आणि कोहली यांच्या 49 धावांच्या जोरावर भारताने 20 षटकांत 3 बाद 237 धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ 20 षटकांत 3 गडी गमावून 221 धावाच करू शकला. मात्र, एका क्षणी मिलर आणि डी कॉक भारताकडून हा सामना हिसकावून घेतील असे वाटत होते. दक्षिण आफ्रिकेकडून डेव्हिड मिलरने सर्वाधिक 106 धावा केल्या. दरम्यान या झालेल्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेवर केलेल्या विजयात अनेक विक्रम मोडीत काढले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)