भारतीय महिला क्रिकेट संघ आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना आज खेळला गेला. दोन्ही संघांमधील हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. दुसऱ्या टी-20 सामन्यात इंग्लंडने टीम इंडियाचा चार विकेट राखून पराभव केला आणि मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली. या विजयासह इंग्लंडने टी-20 मालिकाही जिंकली. तत्पूर्वी, इंग्लंडची कर्णधार हीदर नाइटने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारून प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाचा डाव 16.2 षटकात केवळ 80 धावांवरच मर्यादित राहिला. टीम इंडियाकडून जेमिमाह रॉड्रिग्जने सर्वाधिक 30 धावा केल्या. इंग्लंडकडून शार्लोट डीन, लॉरेन बेल, सोफी एक्लेस्टोन आणि सारा ग्लेन यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या इंग्लंड संघाने अवघ्या 11.2 षटकांत सहा गडी गमावून लक्ष्य गाठले. इंग्लंडकडून अॅलिस कॅप्सीने सर्वाधिक 25 धावांची खेळी खेळली. टीम इंडियाकडून रेणुका ठाकूर सिंग आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना उद्या म्हणजेच 10 डिसेंबर रोजी होणार आहे.
A good fightback from #TeamIndia, but it was England who won the 2nd T20I.
India will aim to bounce back in the third T20I 👍👍
Scorecard ▶️ https://t.co/ioHH8Ujek4#TeamIndia | #INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/9Qt3g59oP8
— BCCI Women (@BCCIWomen) December 9, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)