शनिवारी, टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना ब्रिजटाऊन, बार्बाडोस येथे खेळला गेला. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजने टीम इंडियाचा सहा गडी राखून पराभव केला आणि मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. या पराभवानंतर टीम इंडियावर बरीच टीका झाली. या सामन्याशी संबंधित एक मनोरंजक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) डगआउटमध्ये बसलेल्या युझवेंद्र चहलला मजेशीर पद्धतीने मारहाण करताना दिसत आहे. युझवेंद्र चहलच्या (Yuzvendra Chahal) शेजारी बसलेले विराट कोहली आणि जयदेव उनाडकट देखील या दृश्याचा आनंद घेताना दिसत आहेत.

पहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)