सर्व क्रिकेटप्रेमी आयसीसी विश्वचषक 2023 च्या वेळापत्रकाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आयसीसी टूर्नामेंट सुरू होण्याच्या 100 दिवस आधी म्हणजे आज (ICC World Cup Schedule 2023) जाहीर केले आहे. या मेगा इव्हेंटचे ड्राफ्ट शेड्यूल आधीच व्हायरल झाले. वेळापत्रकानुसार, आयसीसी विश्वचषक 2023 5 ऑक्टोबरपासून नरेंद्र मोदी स्टेडियमवर इंग्लंडचा न्यूझीलंडशी सामना होणार आहे. तर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ 8 ऑक्टोबर रोजी चेन्नई येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याने आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. यानंतर, 11 ऑक्टोबरला मेन इन ब्लूचा दिल्लीत अफगाणिस्तानशी सामना होईल. भारत आणि कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान यांच्यात ही चुरशीची लढत होणार आहे. बाबर आझमच्या नेतृत्वाखाली 15 ऑक्टोबर रोजी अहमदाबाद येथे होणार आहे.
पहा वेळापत्रक
GET YOUR CALENDARS READY! 🗓️🏆
The ICC Men's @cricketworldcup 2023 schedule is out now ⬇️#CWC23https://t.co/j62Erj3d2c
— ICC (@ICC) June 27, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)