ICC Rankings: मिताली राज हिची ODI क्रमवारीत घसरण सुरूच; स्मृती मंधाना फलंदाज तर झुलन गोस्वामी अष्टपैलूच्या टॉप-10 मध्ये परतल्या

ICC Women's Rankings: न्यूझीलंड येथे आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक 2022 सुरु असताना ICC ने खेळाडूंची ताजी क्रमवारी जरी जारी केली आहे. महिला एकदिवसीय क्रमवारीत भारतीय कर्णधार मिताली राज हिची घसरण सुरूच आहे. तर सलामीवीर स्मृती मंधाना 663 रेटिंगसह टॉप-10 फलंदाजांच्या यादीत परतली आहे. दुसरीकडे, झुलन गोस्वामीने अष्टपैलू खेळाडूंच्या पहिल्या 10 मध्ये पुनरागमन केले.

ICC Rankings: मिताली राज हिची ODI क्रमवारीत घसरण सुरूच; स्मृती मंधाना फलंदाज तर झुलन गोस्वामी अष्टपैलूच्या टॉप-10 मध्ये परतल्या
स्मृती मंधाना आणि मिताली राज (Photo Credit: Instagram, Facebook)

ICC Women's Rankings: आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक (ICC Women's World Cup) 2022 मधील आश्चर्यकारक कामगिरीला एकदिवसीय खेळाडू क्रमवारीद्वारे पुरस्कृत करण्यात आले आहे. ICC ने जरी केलेल्या नवीन महिला एकदिवसीय क्रमवारीत भारतीय कर्णधार मिताली राज (Mithali Raj) हिची घसरण सुरूच आहे. तर सलामीवीर स्मृती मंधाना (Mithli Raj) 663 रेटिंगसह टॉप-10 फलंदाजांच्या यादीत परतली आहे. दुसरीकडे, गोलंदाजांच्या क्रमवारीत दिग्गज भारतीय झुलन गोस्वामी (Jhulan Goswami) सातव्या क्रमांकावर घसरली आहे. पण झुलनने अष्टपैलू खेळाडूंच्या पहिल्या 10 मध्ये पुनरागमन केले आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 22, 2022 02:42 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).