आयपीएल 2024 चा (IPL 2024) आठवा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स (SRH vs MI) यांच्यात होणार आहे. आयपीएल 2024 मध्ये दोन्ही संघांचे खाते अद्याप उघडलेले नाही. सध्याच्या हंगामातील पहिल्याच सामन्यात दोन्ही संघांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. गुजरातविरुद्धच्या रोमहर्षक सामन्यात मुंबईला 6 धावांनी पराभव स्वीकारावा लागला, तर कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या निकराच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादला 4 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. पॉइंट टेबलमध्ये सनरायझर्सचा संघ सातव्या, तर मुंबईचा संघ आठव्या स्थानावर आहे. या सामन्यात पुन्हा एकदा सर्वांच्या नजरा हार्दिक पांड्याकडे लागल्या आहेत कारण मुंबई इंडियन्सचे चाहते त्याला कर्णधार म्हणून पसंत करत नाहीत आणि गेल्या सामन्यात त्याला खूप ट्रोल करण्यात आले होते. अशा स्थितीत पुन्हा एकदा सामन्यात त्याच्या कर्णधारपदावर सर्वांचे लक्ष असेल.
It's Rohit Sharma and Pat Cummins in action today 🤩
Catch these superstars tonight on 𝐇𝐞𝐫𝐨𝐂𝐚𝐦 with #IPLonJioCinema 📸#SRHvMI #TATAIPL #JioCinemaSports pic.twitter.com/T5q2KlBBuI
— JioCinema (@JioCinema) March 27, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)