IPL 2024: सनरायझर्स हैदराबादचा फलंदाज हेनरिक क्लासेन (Henrik Klaassen) आयपीएल 2024 मध्ये (IPL 2024) चांगली फलंदाजी करत आहे. त्यामुळे हैदराबाद संघाने या मोसमात अनेकदा 200 हून अधिक धावा केल्या आहेत. या मोसमात दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजाने आपल्या स्फोटक फलंदाजीने भारतीय चाहत्यांना वेड लावले आहे. नुकताच हेनरिक क्लासेन हैदराबादमधील एका मॉलमध्ये पोहोचला होता. यावेळी त्याच्यासोबत संघातील आणखी एक खेळाडू जयदेव उनाडकटचाही समावेश होता. यावेळी मॉलमध्ये चाहत्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. स्वत:ला गर्दीने वेढलेले पाहून हेनरिक क्लासेन थोडासा चिडलेला दिसला. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)