एकदिवसीय विश्वचषकाच्या 12व्या सामन्यात भारताचा सामना पाकिस्तानशी (IND vs PAK) होत आहे. दोन्ही संघांमधील हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Ahmedabad's Narendra Modi Stadium) खेळवला जात आहे. या सामन्याद्वारे टीम इंडिया वनडे वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध सलग आठव्या विजयासाठी मैदानात उतरणार आहे. आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान एकूण सात वेळा आमनेसामने आले आहेत, ज्यामध्ये टीम इंडियाने प्रत्येक वेळी विजय मिळवला आहे. दोन्ही संघ या स्पर्धेतील तिसऱ्या विजयावर आहेत. भारत आणि पाकिस्तानने प्रत्येकी दोन सामने खेळले आहेत आणि दोन्ही जिंकले आहेत. दरम्यान, भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करत असलेल्या पाकिस्तान संघाला दुसरा धक्का लागला आहे. हार्दिक पांड्याने इमाम उल हकला बाद केले. पण त्याआधी त्याने बाॅल सोबत असे काही कृत्य केले ज्याचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Hardik pandya saying something to the ball before wicket 😂😂#indvspak2023 #INDvPAK #CWC23 #CWC2023 #HardikPandya #ViratKohli𓃵 #RohitSharma𓃵 #Gill #ShubmanGill pic.twitter.com/HtRGyUipMt
— Rohit (@mummidirohit) October 14, 2023
Hardik Pandya ne ball par mantar phoonk kar out kia hai Imam ko wrna toh honhi rha tha...😂#INDvsPAK #PakistanCricketTeam #BabarAzam #Imamulhaq #Pandya #Siraj #NationalAnthem #Toss #ShubmanGill #ViratKohli #Shaheen #ShadabKhan #Bumrah #Abdullah #AbdullahShafiq #CWC2023 pic.twitter.com/bIHQmowYd2
— Naimal (@naimal_imtiaz) October 14, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)