Hamza Saleem Dar Record Knock: क्रिकेटमध्ये एका फलंदाजाने अप्रतिम खेळी खेळली आहे. हमजा सलीम दार (Hamza Saleem Dar) असे या फलंदाजाचे नाव आहे. हमजाने केवळ 43 चेंडूत 193 धावा केल्या आहेत. येथे त्याने 449 च्या अविश्वसनीय स्ट्राइक रेटने फलंदाजी केली आहे. म्हणजेच प्रत्येक चेंडूवर त्याला 4 पेक्षा जास्त धावा मिळाल्या. स्पेनमध्ये खेळल्या जाणाऱ्या युरोपियन क्रिकेट मालिकेत हमजाची ही झंझावाती खेळी झाली आहे. या खेळीमुळे त्याने T10 क्रिकेट फॉरमॅटमधील सर्वात मोठी इनिंग खेळण्याचा विक्रमही केला आहे. युरोपियन क्रिकेट मालिकेत मंगळवारी (5 डिसेंबर) कॅटालुनिया जग्वार आणि सोहल हॉस्पिटल यांच्यात सामना झाला. येथे कॅटालोनियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांचा फलंदाज हमजाच्या या विनाशकारी खेळीमुळे त्यांनी अवघ्या 10 षटकांत 257 धावा केल्या. येथे विशेष गोष्ट म्हणजे हमजाने संपूर्ण संघाच्या एकूण स्कोअरपैकी 75% धावा केल्या. (हे देखील वाचा: IND vs SA T20 Series: टी-20 मालिकेसाठी 'या' पाच भारतीय खेळाडूंवर राहणार नजर, दक्षिण आफ्रिकेतील उसळत्या खेळपट्टीवर होणार खरी परीक्षा)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)