विश्वचषक 2023 च्या 33व्या (ICC Cricket World Cup 2023) सामन्यात आज भारताचा सामना श्रीलंकेशी (IND vs SL) होत आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. सहापैकी सहा सामने जिंकून टीम इंडिया मजबूत स्थितीत आहे, तर श्रीलंकेने सहापैकी केवळ दोनच सामने जिंकले आहेत. आजच्या विजयासह भारत उपांत्य फेरीतील आपले स्थान जवळपास निश्चित करेल. त्याच वेळी, श्रीलंकेसाठी हा करा किंवा मरोचा सामना आहे. दरम्यान, श्रीलंकेचा कर्णधार कुसल मेंडिसने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या टीम इंडियाने श्रीलंकेसमोर 358 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. भारताकडून शुभमन गिल 92, विराट कोहली 88 आणि श्रेयस अय्यरने 82 सर्वाधिक धावा केल्या. तर श्रीलंकेकडून दिलशान मधुशंकाने 5 सर्वाधिक विकेट घेतल्या. श्रीलंकेला हा सामना जिंकण्यासाठी 50 षटकात 358 धावा करायच्या आहेत. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या श्रीलंकेच्या संघाला पाचवा मोठा धक्का बसला आहे. श्रीलंकेच्या संघाचा स्कोअर 14/5
Another one!
Mohd. Shami is now on a HAT-TRICK!#TeamIndia | #CWC23 | #MenInBlue | #INDvSL https://t.co/3oAAHSg7ro
— BCCI (@BCCI) November 2, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)