टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना आज इंदूरमध्ये खेळला जात आहे. टीम इंडियाने पहिला एकदिवसीय सामना 5 विकेटने जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. टीम इंडियाला दुसरी वनडे जिंकून मालिकेत अभेद्य आघाडी घेण्याची संधी आहे. या सामन्यात केएल राहुल टीम इंडियाचे नेतृत्व करत आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादव यांना पहिल्या दोन सामन्यांसाठी विश्रांती देण्यात आली आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स आज खेळत नाही. कमिन्सच्या जागी जोस हेझलवूडचा समावेश आहे. टीम इंडियाकडून, अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आजच्या सामन्याचा भाग नाही. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाने निर्धारित 50 षटकांत पाच गडी गमावून 399 धावा केल्या. टीम इंडियाकडून श्रेयस अय्यरने सर्वाधिक 105 धावांची खेळी खेळली. ऑस्ट्रेलियाकडून कॅमेरून ग्रीनने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. हा सामना जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघाला 50 षटकात 400 धावा करायच्या आहेत. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला चौथा मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलिया संघाची धावसंख्या 110/5 आहे.
2ND ODI. WICKET! 14.5: Josh Inglis 6(9) lbw Ravichandran Ashwin, Australia 101/5 https://t.co/OeTiga5wzy #INDvAUS @IDFCFIRSTBank
— BCCI (@BCCI) September 24, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)