आज कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड कप 2023 चा दुसरा सेमीफायनल सामना खेळला जात आहे. दोन्ही संघ तुल्यबळ लढत देणार आहेत. विश्वचषक 2023 च्या साखळी टप्प्यातील सामन्यांमध्ये दोन्ही संघांनी प्रत्येकी 7 सामने जिंकले होते. हेड टू हेड सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ऑस्ट्रेलियाचा 134 धावांनी पराभव केला. गेल्या चार हेड टू हेड सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियन संघाचा पराभव केला असला तरी जेव्हा उपांत्य फेरी गाठली जाते तेव्हा ऑस्ट्रेलियाचाच वरचष्मा दिसतो. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या दक्षिण आफ्रिकेला 49.4 षटकांत केवळ 212 धावा करता आल्या. दक्षिण आफ्रिकेसाठी स्टार फलंदाज डेव्हिड मिलरने 101 धावांची शानदार खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक तीन बळी घेतले. हा सामना जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघाला 50 षटकात 213 धावा करायच्या आहेत. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला पाचवा मोठा झटका बसला आहे. ऑस्ट्रेलिया संघाचा स्कोअर 141/5 आहे.
Tabraiz Shamsi is on a roll 🔥
Glenn Maxwell is bowled, and it's GAME ON AT EDEN GARDENS! #SAvAUS #CWC23
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) November 16, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)