CSK vs GT: आयपीएल 2023 चा (IPL 2023) पहिला क्वालिफायर सामना चेन्नई विरुध्द गुजरात (CSK vs GT) पाहायला मिळत आहे. हा सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर (Chennai's Chepauk Stadium) खेळवला जात आहे. हा सामना संध्याकाळी 7.30 पासून सुरू होईल. क्वालिफायर 1 जिंकणारा संघ थेट आयपीएलच्या अंतिम फेरीत जाईल. त्याचबरोबर पराभूत संघाला आणखी एक संधी मिळणार आहे. त्याला एलिमिनेटरमध्ये विजेत्या संघाविरुद्ध क्वालिफायर-2 खेळावे लागेल. दरम्यान, गुजरातने टाॅस जिंकून प्रथम गोलंदांजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

पहा दोन्ही संघीची प्लेइंग 11

चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, अंबाती रायुडू, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर/कर्णधार) दीपक चहर, तुषार देशपांडे, महेश थिकशाना.

गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): शुभमन गिल, रिद्धिमान साहा (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (कर्णधार), दासून शनाका, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, दर्शन नळकांडे, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)