भारतीय संघ फेब्रुवारी-मार्चमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी खेळणार आहे. चारपैकी पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी टीम इंडियाचा संघही नुकताच जाहीर करण्यात आला. दीर्घकाळ दुखापतीमुळे बाहेर असलेल्या रवींद्र जडेजाच्या नावाचाही या संघात समावेश होता. मात्र, तंदुरुस्तीच्या आधारावरच त्याचा संघात समावेश करण्यात आला. आता मात्र टीम इंडियासाठी या महत्त्वाच्या मालिकेपूर्वी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. त्यानुसार जडेजा ऑस्ट्रेलिया मालिकेपूर्वीच पूर्णपणे तंदुरुस्त झाला असून तो पुन्हा मैदानावर अप्रतिम कामगिरी करण्यास सज्ज झाला आहे. रविवारी जडेजाने एक ट्विट केले आणि लिहिले, वनक्कम चेन्नई... म्हणजे टीम इंडियाचा हा स्टार अष्टपैलू खेळाडू मंगळवारपासून चेन्नईमध्ये तामिळनाडू संघाविरुद्ध खेळण्यासाठी सज्ज आहे. चेन्नईला पोहोचल्यानंतर जडेजाने हे ट्विट केले आणि आपल्या रणजी संघ सौराष्ट्रमध्ये सामील झाला.
Vanakkam Chennai..?
— Ravindrasinh jadeja (@imjadeja) January 22, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)