ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत भारतासमोर 353 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना दुसरा धक्का 21व्या षटकात 144 धावांवर बसला. या षटकातील शेवटच्या चेंडूवर रोहित शर्माने सरळ शॉट खेळला. मॅक्सवेलने स्वतःचा बचाव करण्यासाठी हात पुढे केला आणि चेंडू त्याच्या हाताला चिकटला. अशात तो झेलबाद झाला. रोहितने 57 चेंडूत 81 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने पाच चौकार आणि सहा षटकार मारले. मात्र, या सामन्यात ख्रिस गेलचा मोठा विक्रम मोडण्यास तो चुकला. रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या 471 डावांमध्ये 551 षटकार ठोकले आहेत. तर, गेलने 553 षटकार मारले होते. आता रोहित विश्वचषकात गेलचा विक्रम मोडू शकतो. सध्या विराट कोहली आणि श्रेयस अय्यर क्रीजवर आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)