LSG vs PBKS,IPL 2024 11th Match: आयपीएल 2024 मध्ये (IPL 2024) आज पंजाब किंग्ज आणि लखनौ सुपरजायंट्स (PBKS vs LSG) आमनेसामने असुन लखनौच्या अटल बिहारी वाजपेयी एकना स्टेडियमवर खेळवला जात आहे. पंजाब किंग्जने त्यांच्या 2 पैकी एक सामना जिंकला आहे, तर लखनौ सुपर जायंट्सला त्यांच्या पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. लखनौ सुपर जायंट्स आयपीएल 2024 मध्ये केएल राहुलच्या नेतृत्वाखाली त्यांचा पहिला विजय मिळवण्याचा प्रयत्न करेल. दरम्यान, लखनौने पंजाबविरुद्ध नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदांजी करताना लखनौने पंजाब 200 धावांचे लक्ष्य दिले आहे. लखनौसाठी सलामीवीर क्विंटन डी कॉकने 54 धावांची शानदार खेळी केली. पंजाब किंग्जकडून सॅम कुरनने सर्वाधिक तीन बळी घेतले. पंजाब किंग्ज संघाला हा सामना जिंकण्यासाठी 20 षटकात 200 धावा करायच्या आहेत. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पंजाब किंग्ज संघाचा सलामीवीर शिखर धवनने अवघ्या 30 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. पंजाब किंग्ज संघाचा स्कोअर 101/0.
Match 11. WICKET! Over: 11.4 Jonny Bairstow 42(29) ct Marcus Stoinis b Mayank Yadav, Punjab Kings 102/1 https://t.co/HvctlP1bZb #TATAIPL #IPL2024 #LSGvPBKS
— IndianPremierLeague (@IPL) March 30, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)