Ex-Bengal Cricketer Suvojit Banerjee Passes Away: माजी बंगाल रणजी ट्रॉफी खेळाडू सुवोजित बॅनर्जी (Suvojit Banerjee) यांचे सोमवारी वयाच्या 39 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. कौटुंबिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बॅनर्जी हे अजूनही स्थानिक क्रिकेटमध्ये सहभाग घेत होते. त्यांनी सोनारपूर येथील त्यांच्या निवासस्थानी सकाळी नाश्ता केला आणि झोप घेतली. काही तासांनंतर तो प्रतिसाद देत नसल्याचे आढळल्याने त्यांनी डॉक्टरांना बोलावले. डॉक्टरांनी सुवोजित यांना मृत घोषित केले. बॅनर्जी यांनी 2014 मध्ये ओडिशा विरुद्ध विजय हजारे ट्रॉफी सामन्यात बंगालसाठी पदार्पण केले होते. तसेच ते तीन रणजी ट्रॉफी सामन्यांमध्ये खेळले होते.
बंगालचा माजी रणजी क्रिकेटपटू सुवोजित बॅनर्जीचे निधन -
Tragic! Former Bengal Ranji Cricket Player Dies Of Cardiac Arrest At 39#RanjiTrophy #Crickethttps://t.co/JeVNZEfxf9
— Free Press Journal (@fpjindia) December 24, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)