टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज हैदराबादमध्ये खेळला जात आहे. टीम इंडियाला या सामन्यात विजयाने मालिका सुरू करायची आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 50 षटकांत 8 गडी गमावून 349 धावा केल्या. टीम इंडियाकडून युवा सलामीवीर शुभमन गिलने सर्वाधिक 208 धावा केल्या. न्यूझीलंडकडून हेन्री शिपले आणि डॅरिल मिशेल यांनी सर्वाधिक 2-2 विकेट घेतल्या. न्यूझीलंडला हा सामना जिंकण्यासाठी 50 षटकात 350 धावा करायच्या आहेत. लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाला पहिला मोठा झटका बसला. सलामीवीर डेव्हॉन कॉनवे 10 धावा करून मोहम्मद सिराजचा बळी ठरला. न्यूझीलंडचा स्कोर 62/1.
पहा व्हिडीओ
First success with the ball for #TeamIndia! ? ?
First international wicket on his home ground for @mdsirajofficial
New Zealand lose Devon Conway
Live - https://t.co/DXx5mqRguU #INDvNZ @mastercardindia pic.twitter.com/J7Hj6aeyid
— BCCI (@BCCI) January 18, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)