भारत आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघ (India W vs England W) यांच्यातील तीन सामन्यांची टी-20 मालिका (T20 Series) संपली आहे. इंग्लंडने ही मालिका 2-1 ने जिंकली. मात्र, पहिले दोन सामने गमावल्यानंतर भारतीय संघाने तिसऱ्या सामन्यात दमदार पुनरागमन करत शेवटचा सामना जिंकला. आता यजमान भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी खेळली जाणार असून, त्यासाठी पाहुणा संघ नवी मुंबईत दाखल झाला आहे. येथे पोहोचल्यावर इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाचे भव्य स्वागत करण्यात आले. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाच्या खेळाडू नवी मुंबईतील हॉटेलमध्ये प्रवेश करताना दिसत आहेत. यावेळी ढोल वाजवून त्यांचे स्वागत करण्यात आले. भारतातील हे पारंपारिक स्वागत पाहून इंग्लंडच्या महिला संघाच्या खेळाडू खूप आनंदी दिसल्या आणि काही जण ढोलाच्या तालावर नाचतानाही दिसले. हा व्हिडिओ शेअर करताना इंग्लंड क्रिकेटने भारतातील या शानदार स्वागताचे कौतुक केले आहे. (हे देखील वाचा: ICC ने जाहीर केले U19 World Cup 2024 वेळापत्रक, टीम इंडिया पहिला सामना कधी खेळणार? जाणून घ्या तपशील वाचा)

पाहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)