भारतीय महिला क्रिकेट संघ आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आज खेळवला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. दुसऱ्या टी-20 सामन्यात इंग्लंडने टीम इंडियाचा चार विकेट राखून पराभव केला आणि मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली. या विजयासह इंग्लंडने टी-20 मालिकाही जिंकली. दरम्यान, इंग्लंडची कर्णधार हीदर नाइटने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या इंग्लंड संघाने निर्धारित 20 षटकात 126 धावा केल्या. इंग्लंडकडून कर्णधार हीदर नाइटने सर्वाधिक 52 धावा केल्या. टीम इंडियाकडून सायका इशाक आणि श्रेयंका पाटील यांनी प्रत्येकी सर्वाधिक तीन बळी घेतले. टीम इंडियाला हा सामना जिंकण्यासाठी 20 षटकात 127 धावा करायच्या आहेत. (हे देखील वाचा: Under-19 Asia Cup: पाकिस्तानने भारताचा एकतर्फी केला पराभव, उपांत्य फेरीतून बाहेर पडण्याचा धोका)
Innings Break!
A fine bowling performance from #TeamIndia! 👏 👏
3⃣ wickets each for @shreyanka_patil & Saika Ishaque
2⃣ wickets each for Renuka Singh Thakur & Amanjot Kaur
Over to our batters now 👍 👍
Scorecard ▶️ https://t.co/k4PSsXNAIE #INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/ZC7omMET9L
— BCCI Women (@BCCIWomen) December 10, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)