England New Squad: पाकिस्तानविरुद्ध वनडे मालिकेसाठी स्टार इंग्लंड खेळाडूला डच्चू, Michael Vaughan म्हणाले- ‘हा त्याच्या आंतरराष्ट्रीय करिअरचा अंत’
पाकिस्तानविरुद्ध जाहीर झालेल्या पहिल्या इंग्लंड वनडे संघातील एकूण 7 सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे इंग्लंड क्रिकेट बोर्डाने बेन स्टोक्सच्या नेतृत्वात नवीन संघ जाहीर केला असून अॅलेक्स हेल्सला पुन्हा डच्चू देण्यात आला आहे. इंग्लंडचे माजी कर्णधार माइकल वॉनने हेल्सची निवड न झाल्यावर प्रतिक्रिया देत म्हटले की त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द आता संपली असावी.
ENG vs PAK ODI 2021 Squad: पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) जाहीर झालेल्या पहिल्या इंग्लंड वनडे संघाच्या (England ODI Squad) बायो-बबलमध्ये कोरोना व्हायरसचा शिरकाव झाल्यामुळे एकूण 7 सदस्य पॉझिटिव्ह आढळले. यामुळे इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (England Cricket Board) बेन स्टोक्सच्या नेतृत्वात नवीन संघ जाहीर केला असून अॅलेक्स हेल्सला (Alex Hales) पुन्हा डच्चू देण्यात आला आहे. विश्वचषक 2019 पूर्वी ड्रगची चाचणी सकारात्मक आल्यानंतर हेल्स इंग्लंडच्या राष्ट्रीय संघातून बाहेर आहे. इंग्लंडचे माजी कर्णधार माइकल वॉनने (Michael Vaughan) हेल्सची निवड न झाल्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे आणि त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द आता संपली असावी असे त्यांनी म्हटले.
So No Alex Hales … that must be the end of his international career then … find it very sad that someone who made a huge mistake but was punished can’t be given another go … we all mistakes every week … !!! Those that say they don’t are lying … #OnOn
— Michael Vaughan (@MichaelVaughan) July 6, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 06, 2021 05:12 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

