अॅशेस मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया (ENG vs AUS) यांच्यात सामना झाला. दोन्ही संघांमधील हा सामना हेडिंग्लेच्या मैदानावर झाला. इंग्लंडने तिसर्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा तीन गडी राखून पराभव करत शानदार पुनरागमन केले. पाच सामन्यांच्या मालिकेत इंग्लंड अजूनही 2-1 ने पिछाडीवर आहे. 251 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडच्या संघाने 50 षटकांत सात गडी गमावून लक्ष्य गाठले. याआधी तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 263 धावा आणि दुसऱ्या डावात 224 धावा केल्या होत्या. इंग्लंडने पहिल्या डावात 237 धावा केल्या होत्या. अशा प्रकारे ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 26 धावांची आघाडी मिळाली. इंग्लंडकडून कर्णधार बेन स्टोक्सने पहिल्या डावात सर्वाधिक 80 धावा केल्या. जॅक क्रॉलीने 33, मार्क वुडने 24 आणि मोईन अलीने 21 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्स आणि स्कॉट बोलँड यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले.
🏴 ENGLAND WIN! 🏴
Must win. Did win!
COME ON! 💪 #EnglandCricket | #Ashes pic.twitter.com/x9VfxLRRbU
— England Cricket (@englandcricket) July 9, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)