आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 चा 40 वा सामना इंग्लंड आणि नेदरलँड्स यांच्यात खेळला जात आहे. हे दोन्ही संघ गुणतालिकेत तळाशी असून उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर आहेत. इंग्लंडने 7 सामने खेळले आहेत आणि फक्त एक जिंकला आहे. तर नेदरलँड्सने 7 सामने खेळले असून दोन सामने जिंकले आहेत. दरम्यान, इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या इंग्लंड संघाने निर्धारित 50 षटकांत नऊ गडी गमावून 339 धावा केल्या. इंग्लंडकडून स्टार अष्टपैलू बेन स्टोक्सने 108 धावांची शानदार खेळी केली. नेदरलँड्सकडून बास डी लीडेने सर्वाधिक तीन बळी घेतले. हा सामना जिंकण्यासाठी नेदरलँड संघाला 50 षटकात 340 धावा करायच्या आहेत.
पाहा पोस्ट -
We finish our overs in Pune on 3️⃣3️⃣9️⃣
Chris Woakes 51 (45)
Dawid Malan 87 (74)
Ben Stokes 108 (84)
Well batted, lads 💪#EnglandCricket | #CWC23 pic.twitter.com/OAUBYQTemp
— England Cricket (@englandcricket) November 8, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)