नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमध्ये झालेल्या गुजरात जायंट्स (Gujarat Giants Women) विरुद्ध दिल्ली कॅपिटलच्या (Delhi Capitals Women) सामन्यात गुजरातने दिलेल्या 106 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या दिल्लीच्या शफाली वर्मा (Shafali Verma) आणि मेग लॅनिंग दमदार खेळी करत या सामन्यात मोठा विजय प्राप्त केला. अवघ्या 19 चेंडूत अर्धशतक करणाऱ्या शफाली वर्माने 28 चेंडूत नाबाद 76 धावांची खेळी केली.  तर कर्णधार मेग लॅनिंगने 15 चेंडूत 21 धावा केल्या. शफालीने 10 चौकार आणि 5 षटकार मारून गुजरातच्या गोलंदाजीची हवा काढली. प्रथम फलंदाजी करताना . गुजरातने 9 गडी गमावत 20 षटकात 105 धावांची मजल मारली.  शफालीच्या खेळीमुळे अवघ्या 7.1 षटकांत हे आव्हान गाठण्यास यश आले.

पहा ट्विट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)