RCB vs SRH, IPL 2024: आयपीएल 2024 मध्ये (IPL 2024) आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि सनरायझर्स हैदराबाद (RCB vs SRH) यांच्यात बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जात आहे. आरसीबीने आयपीएल 2024 मध्ये 6 पैकी 5 सामने गमावले आहेत आणि फक्त 1 सामना जिंकला आहे. यासह, ते 2 गुणांसह गुणतालिकेत तळाच्या 10व्या स्थानावर आहेत. दुसरीकडे, हैदराबादने 5 पैकी 3 सामने जिंकले आहेत, तर 2 सामने गमावले आहेत. ते 6 गुणांसह गुणतालिकेत 5 व्या क्रमांकावर आहेत. दरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदांजीसाठी आलेल्या हैदराबादने बेंगळरु समोर 288 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. हैदराबादसाठी ट्रॅव्हिस हेडने 41 चेंडूत 102 धावा, हेनरिक क्लासेनने 31 चेंडूत 67 धावा सर्वाधिक धावा केल्या. तर, बेंगळुरूकडून लॉकी फर्ग्युसन सर्वाधिक 2 विकेट घेतल्या. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या बेंगळुरुचा अनुभवी खेळाडू दिनेश कार्तिकने 23 चेंडूत अर्धशतक ठोकले आहे. आरसीबीचा स्कोर 216/6
DINESH KARTHIK, THE 38 YEAR OLD FINISHER...!!!!
52* in just 23 balls - what a knock. He's giving his best for RCB. 👌 pic.twitter.com/YFNjrNR43R
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 15, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)