DC vs RCB, TATA IPL 2025 46th Match: इंडियन प्रीमियर लीग 2025 चा 46 वा सामना आज म्हणजेच 27 एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (DC vs RCB) यांच्यात दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जात आहे. या हंगामात, आरसीबीचे नेतृत्व रजत पाटीदार करत आहे. तर, दिल्ली कॅपिटल्सची कमान अक्षर पटेलच्या खांद्यावर आहे. या हंगामात दोन्ही संघांची कामगिरी आतापर्यंत उत्कृष्ट राहिली आहे. त्यामुळे आजचा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा असणार आहे. दरम्यान, बंगळुरुने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकात 8 गडी गमावून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसमोर 163 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

केएल राहुलची 41 धावांची सर्वाधिक खेळी

प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने निर्धारित 20 षटकांत आठ गडी गमावून 162 धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्सकडून स्टार फलंदाज केएल राहुलने 41 धावांची शानदार खेळी केली. या उत्कृष्ट खेळीदरम्यान, केएल राहुलने 39 चेंडूत तीन चौकार मारले. केएल राहुल व्यतिरिक्त, धोकादायक फलंदाज ट्रिस्टन स्टब्सने 34 धावा केल्या.

भुवीने घेतल्या 3 विकेट

दुसरीकडे, घातक वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. भुवनेश्वर कुमार व्यतिरिक्त जोश हेझलवूडने दोन विकेट घेतल्या. हा सामना जिंकण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला 20 षटकांत 163 धावा कराव्या लागतील. दोन्ही संघांना हा सामना जिंकून स्पर्धेत दोन गुण मिळवायचे आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)