दिल्ली कॅपिटल्सने लखनौ सुपर जायंट्सला 209 धावांचे लक्ष्य दिले आहे, ज्यामध्ये ट्रिस्टन स्टब्स (57), अभिषेक पोरेल (58) यांनी अर्धशतके झळकावली आहेत. ज्यामध्ये ऋषभ पंत (33) आणि शाई होप (38) यांनी धावांचे योगदान दिले आहे. दिल्ली कॅपिटल्स (DC) विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स (LSG) IPL 2024 सामना क्रमांक 64 हा 14 मे (मंगळवार) नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे. लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक हारल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 4 गडी गमावून 208 धावा जोडल्या. एलएसजीकडून नवीन-उल-हकने 2, रवी बिश्नोई आणि अर्शद खानने 1-1 बळी घेतला.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)