Tushar Deshpande Wedding: एमएस धोनीचा हुक्कमी एक्का आणि चेन्नई सुपर किंगचा वाघ तुषार देशपांडे (Tushar Deshpande) गुरुवारी विवाहबंधनात अडकला आहे. तुषारने काॅलेज मैत्रीण नभा गड्डमवार हिच्यसोबत लग्नगाठ बांधली. कल्याणमधील एका हॉलमध्ये काल त्यांचा विवाह संपन्न झाला. या लग्नसोहळ्यासाठी आणि नवविवाहीत दांपत्याला शुभेच्छा देण्यासाठी आयपीएलमधील आणि मुंबई संघाकडून एकत्र खेळणारे प्रशांत सोलंकी,धवल कुलकर्णी, भावीन ठक्कर, शिवम दुबे या स्टार क्रिकेटपटूंनी या लग्नाला हजेरी लावली. गतवेळच्या आयपीएल स्पर्धेत तुषार देशपांडे याने भेदक मारा केला होता. चेन्नईच्या विजयात त्याने मोलाची भूमिका बजावली होती. (हे देखील वाचा: Team India New Record: भारताने ऑस्ट्रेलियाचा 24 वर्ष जुना विक्रम मोडला, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजय मिळवताच रचला इतिहास)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)