Rishab Pant Car Accident: भारतीय संघाचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतच्या कारला शुक्रवारी सकाळी अपघात झाला. त्याचवेळी कारमध्ये उपस्थित पंत यांनाही गंभीर दुखापत झाली. हा अपघात दिल्ली-डेहराडून महामार्गावर झाला, त्यानंतर पंतला डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पंत दिल्लीहून रुरकीला जात होते, तिथे त्यांची कार नरसन शहराजवळ पोहोचली, रेलिंग आणि खांब तोडून कार अनियंत्रितपणे उलटली. यानंतर ऋषभ पंतच्या कारच्या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे, या फुटेजमध्ये तुम्ही पाहू शकतात कसा त्याचा अपघात झाला.
पहा व्हिडीओ
CCTV footage of Rishabh Pant uncontrolled car colliding with divider...exact time of collision is 5:21am#RishabhPantAccident #RishabhPant #CCTV pic.twitter.com/mp6pV4izHf
— Sachin Singh (@sachinsingh1010) December 30, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)