IND vs ENG 3rd Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरी कसोटी (IND vs ENG राजकोटच्या निरंजन शाह स्टेडियमवर खेळवला जात आहे. चौथ्या दिवसाचा खेळ सुरूच आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत टीम इंडियाने 51 षटकांत 2 गडी गमावून 196 धावा केल्या होत्या. दरम्यान, चौथ्या दिवशी लंच ब्रेकपर्यत भारताने दुसऱ्या डावात चार विकेट गमावून 314 धावा घेतल्या आहे. तसेच भारताने 440 धावांची आघाडी घेतली आहे,. यशस्वी 149 आणि सरफराज 22 धावावर खेळत आहे. याआधी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायला आलेल्या टीम इंडियाला 130.5 षटकात 445 धावा करता आल्या नाहीत. टीम इंडियासाठी कर्णधार रोहित शर्माने 131 धावांची सर्वोत्तम खेळी खेळली. इंग्लंडकडून मार्क वुडने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. पहिल्या डावात फलंदाजीसाठी आलेला संपूर्ण इंग्लंड संघ 71.1 षटकात केवळ 319 धावा करू शकला नाही. टीम इंडियाने 126 धावांची आघाडी घेतली आहे. इंग्लंडकडून सलामीवीर बेन डकेटने सर्वाधिक 153 धावांची खेळी खेळली. टीम इंडियाकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक चार विकेट घेतल्या.
It's Lunch on Day 4 in Rajkot!
Adding 118 runs to the overnight score, #TeamIndia have moved to 314/4 🙌
Stay Tuned for Second Session ⌛️
Scorecard ▶️ https://t.co/FM0hVG5pje#INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/ZdjDxl3kWJ
— BCCI (@BCCI) February 18, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)