IND vs BAN 2nd Test: टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यातील 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना शेरे बांगला नॅशनल स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. पहिली कसोटी जिंकून टीम इंडियाने या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. सलामीवीर केएल राहुल टीम इंडियाची कमान सांभाळत आहे. बांगलादेशचा कर्णधार शकिब अल हसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियात एक बदल झाला आहे. कुलदीप यादवच्या जागी जयदेव उनाडकटला संधी देण्यात आली आहे. जयदेव उनाडकट 12 वर्षांनंतर कसोटी खेळत आहे. दरम्यान, लंचपर्यंत बांगलादेश संघाने दोन गडी गमावून धावा केल्या आहेत. मोमिनुल हक 23 आणि शाकिब अल हसन 16 धावा करून क्रीजवर उपस्थित आहेत. बांगलादेशचा स्कोअर 82/2 आहे.
After opting to bat first, Bangladesh have navigated the first session for the loss of two wickets#BANvIND
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) December 22, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)