Ashwini Dhir यांचा 18 वर्षीय मुलगा Jalaj Dhir ने गमावला कार अपघातात जीव; विले पार्ले भागात धडकली कार
कारचा स्पीड हा 120-150 mph असताना ती डिव्हायडरला धडकली आहे.
बॉलिवूड सिनेमे 'अतिथी तुमा कब जाओगे','सन ऑफ सरदार' सिनेमाचे दिग्दर्शक Ashwini Dhir यांनी त्यांचा 18 वर्षाचा मुलगा गमावला आहे. Jalaj Dhir याचा कारच्या अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. Times Of India,च्या माहितीनुसार Jalaj हा IFFI 2024 साठी वडीलांसोबत जाणार होता. मात्र मित्रांसोबत जात असताना त्याचा कार अपघात झाला आहे. Jalaj सोबत अजून एका मुलाचा मृत्यू झाला आहे. रिपोर्ट्सनुसार कार चालवत असलेली व्यक्ती मद्यधुंद होती. कार डिव्हायडरला आदळून हा भीषण अपघात झाला आहे. या वेळेस कारचा स्पीड हा 120-150 mph होता. पार्ले मध्ये कार सर्व्हिस रोड आणि ब्रीज दरम्यान आदळली आहे.
रिपोर्ट्सनुसार, Jalaj आणि त्याचा मित्र सार्थक कौशिकचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या सोबत असलेल्या जिम्मी या मित्राने अपघाताची माहिती पोलिसांना दिली आहे. पोलिसांनी त्या माहितीद्वारा Sahil Mendhaला अटक केली आहे. त्याच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले असून त्याने मद्य प्राशन केले होते का? हे तपासले जाणार आहे. गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडीचा भीषण अपघात झाला. दरम्यान जिम्मीला किरकोळ जखमा झाल्या आहेत.
जिम्मीच्या स्टेटमेंट नुसार, Mendha हा Sahara Star Hotel जवळ गोंधळला आणि त्यामुळे त्याचा कार वरील कंट्रोल गेला. त्यानंतर गाडी थेट डिव्हायडर वर आदळली. दरम्यान जिम्मीने मित्रांना जोगेश्वरीच्या ट्रॉमा सेंटर मध्ये नेले. तेथून त्यांना कोकिलाबेन धीरूबाई अंबानी हॉस्पिटल मध्ये नेले. मात्र डॉक्टरांनी त्यांना पाहूनच मृत घोषित केले. साहिलने सार्थकला भाभा हॉस्पिटलला नेले पण तेथे त्याचा देखील मृत्यू झाला होता.
(The above story first appeared on LatestLY on Nov 27, 2024 12:24 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

