आशिया चषक 2022 सुरू होण्याच्या एक आठवडा आधीच पाकिस्तान क्रिकेट संघाला सर्वात मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) शनिवारी 20 ऑगस्ट रोजी एक अपडेट जारी केला आणि शाहीनच्या दुखापतीबद्दल हे अपडेट दिले. गुडघ्याच्या दुखापतीमुळे आफ्रिदीला एका महिन्याहून अधिक काळ विश्रांतीचा सल्ला देण्यात आल्याचे पाकिस्तानी बोर्डाने म्हटले आहे. आशिया चषक स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचा सामना 28 ऑगस्ट रोजी भारताशी होणार आहे.
Tweet
Shaheen Shah Afridi injury update
Details here ⤵️ https://t.co/bDf5zvwLtl
— PCB Media (@TheRealPCBMedia) August 20, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)