विश्वचषक 2023 च्या 17 व्या (ICC Cricket World Cup 2023) सामन्यात भारत विरुद्ध बांगलादेश (IND vs BAN) यांच्यात सामना होत आहे. हा सामना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, पुणे येथे खेळवला जात आहे. भारतीय संघाने आतापर्यंत खेळलेल्या तीनपैकी तीन सामने जिंकले असून विजयाच्या रथावर स्वार झाला आहे. तर बांगलादेशने आतापर्यंत खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांपैकी फक्त एकच जिंकला आहे आणि दोन गमावले आहेत. दरम्यान, बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. शाकिब अल हसन या सामन्यात खेळत नाहीये. त्याच्या अनुपस्थितीत नझमुल हसन शांतो बांगलादेशचा कर्णधार आहे. दरम्यान, हार्दिक पांड्या मैदानाबाहेर गेला आहे. गोलंदाजी करताना हार्दिक पांड्याला दुखापत झाली. भारतासाठी हा मोठा धक्का आहे. विराट कोहलीने हार्दिक पांड्याची पुर्ण ओव्हर केली आहे. बांगलादेशचा स्कोर 64/0
Virat Kohli comes in to bowl as
Hardik Pandya goes off the field after picking up what looks like an ankle injury!
📸 - Star Sports#INDvBAN #CricketTwitter pic.twitter.com/H4r8ITctMQ
— 100MB (@100MasterBlastr) October 19, 2023
CWC2023. 9.4: Shardul Thakur to Tanzid Hasan 6 runs, Bangladesh 63/0 https://t.co/h882jYKkfB #INDvBAN #CWC23
— BCCI (@BCCI) October 19, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)