मुंबई: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आशियाई क्रिकेट परिषदेत आपला प्रतिनिधी नियुक्त केला आहे. राजीव शुक्ला यांच्याव्यतिरिक्त, बीसीसीआयने आशिष शेलार यांची एसीसीमध्ये प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केली आहे. शुक्रवारी बीसीसीआयने ही घोषणा करताना सांगितले की, राजीव शुक्ला आणि आशिष शेलार हे कार्यकारी मंडळाचे सदस्य म्हणून बीसीसीआयचे प्रतिनिधित्व करतील. राजीव शुक्ला यांनी बीसीसीआयमध्ये विविध पदांवर काम केले आहे. याशिवाय त्यांनी आयपीएल अध्यक्षपदही भूषवले आहे. तर आशिष शेलार यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये काम केले आहे.
Thank our ICC Chairman @JayShah for his support & leadership, & the opportunity to contribute to cricket's continued development across Asia ! https://t.co/kz2eIVQwZM
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) March 7, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)