India National Cricket Team vs New Zealand National Cricket Team: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा (Champions Trophy 2025) 12 वा सामना आज 2 मार्च रोजी भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ (IND vs NZ) यांच्यात दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दोन्ही संघांचा हा तिसरा सामना आहे. या स्पर्धेत टीम इंडियाचे नेतृत्व रोहित शर्मा करत आहे. तर, न्यूझीलंडची कमान मिचेल सँटनरच्या खांद्यावर आहे. हे दोन्ही संघ 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. हा शेवटचा गट सामना आहे. त्याआधी, न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 50 षटकांत 9 गडी गमावून 249 धावा केल्या. दरम्यान, लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंडला सातवा धक्का लागला आहे. न्यूझीलंडचा स्कोर 175/7
Axar Patel with the big one!
Kane Williamson is out for 81 as KL Rahul completes the stumping 😎
Live ▶️ https://t.co/Ba4AY30p5i#TeamIndia | #NZvIND | #ChampionsTrophy pic.twitter.com/9l6935isdO
— BCCI (@BCCI) March 2, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)